भारतातील आंबा आणि डाळिंबाची आता अमेरिकेत निर्यात होणार आहे.



अमेरिकेच्या कृषी विभागाने या आयातीला परवानगी दिली आहे.

त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातील आंबे उपलब्ध होणार आहेत.



भारतीय कृषी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

भारतातून या आधीही अमेरिकेला आंब्याची निर्यात होत होती.



परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय आंब्याच्या निर्यातीवर अमेरिकेकडून निर्बंध घालण्यात आले होते.



भारतातील आंबा आणि डाळिंबाची अमेरिकेला निर्यात करण्यास मंजूरी देण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली.