नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागांत धुक्याचा दाट थर पसरला आहे, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. (Photo Credit : unsplash)



दाट धुक्यामुळे विमान प्रवास आणि रेल्वे उशिराने सुरु आहेत. (Photo Credit : unsplash)



बुधवार आणि गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके असण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



4 फेब्रुवारीपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या डोंगराळ प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Photo Credit : unsplash)



पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Photo Credit : unsplash)



मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)



उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. (Photo Credit : unsplash)



भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे की, पुढील आठवड्यात तीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या हवामानावर परिणाम होईल. (Photo Credit : unsplash)



जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Photo Credit : unsplash)



दरम्यान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी आणि गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)



Thanks for Reading. UP NEXT

लाल, पिवळा नाही, हा आहे सूर्याचा खरा रंग...

View next story