छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी हे ‘अनिरूद्ध देशमुख’ ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ते फोटो आणि किस्से शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. मिलिंद गवळी यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. मिलिंद गवळी यांनी ‘पालखी’, ‘आधार’, ‘वैभव लक्ष्मी’, ‘सून लाडकी सासरची’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo : @milindgawali/IG)