चपातीला तूप लावल्याने त्याच्या चव आणि सुगंधामुळे चपाती खाणं सगळ्यांना आवडतं. चपातीला थोडं तूप लावलं तरी त्याचे अनेक फायदे होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहतं. चपातीला तूप राहिल्याने त्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा कमी होतो. तसेच यामुळे मधूमेहाची देखील शक्यता कमी होते. यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. पण जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकतं. हृदयाचा आजार असलणाऱ्यांचं बॅड कोलेस्ट्रॉल यामुळे वाढू शकतं.