या कुटुंबात 28 वर्षांनंतर मुलगी जन्माला आल्याने शुक्रवारी गावातून हत्तीवरून मुलीची मिरवणूक काढून जिलेबी वाटप करण्यात आली.
गुळहळ्ळीच्या शिवरुद्र आनंदाप्पा हांजगे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावात बँडबाजा, तुतारी व ढोल- ताशांच्या गजरात जिलेबीचे वाटप केले.
हांजगे यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
त्यांनी हत्तीला सजवून कन्येची गावातून मिरवणूक काढली.
स्त्री जन्माचा स्वागत सोहळा त्यांनी केला.