गुजरातविरुद्धच्या सामन्यात रसेलने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. रसेलनं फेकलेल्या अखेरच्या षटकात चार विकेट गेल्या. ज्यामुळे आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेणारा रसेल पहिला वेगवान गोलंदाज झाला आहे. याआधी दोन फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. रसेलने सामन्यात 25 चेंडूत 48 धावा करत अष्टपैलू खेळी केली. रसेलच्या या अप्रतिम कामगिरीनंतरही केकेआर पराभूत झाले. रसेलला कोणत्याही खेळाडूची साथ न मिळाल्याने केकेआर पराभूत झाली. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करत 156 धावा केल्या. कोलकाता 20 षटकात 148 धावाच करु शकला ज्यामुळे 8 धावांनी गुजरातचा संघ जिंकला. पण रसेलच्या अष्टपैलू खेळीसह विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.