मेष : आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवस काहीसा कठीण असणार आहे. मात्र, एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकते.
वृषभ : आज दिवसभर उत्साही राहाल. जे काम हातात घ्याल, त्यात नक्की यश मिळेल. प्रवास करायचा असल्यास तो काही काळ पुढे ढकला.
मिथुन : आजच्या दिवशी कोणतेही काम नाही म्हणून टाळू नका. सततच्या वाढणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल.
कर्क : आज शत्रूला सहज पराजित कराल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात घरगुती जबाबदाऱ्या विसरू नका, अन्यथा कुटुंबाचा रोष ओढवून घ्याल.
सिंह : आज आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
कन्या : आज तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्यासंबंधित कुरबुरी वाढू शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
तूळ : आज दिवसभर मनःशांतीच्या शोधात असाल. अचानक खर्च वाढू शकतात. कामच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
वृश्चिक : समाजकार्यात रस दाखवाल. सामजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांसाठी दिवस आनंदमय असणार आहे. मनातील काही आशा पल्लवित होतील.
धनु : आज तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मनःशांती मिळेल. पैशांचा व्यवहार करताना सावध राहा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मकर : आज तुमचे मन प्रसन्न राहील. स्वतःकडे लक्ष देण्याचा दिवस आहे. एखादी खास भेटवस्तू देखील मिळू शकते. आर्थिक लाभ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
कुंभ : अनावश्यक वाद घालणे टाळा. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज भासल्यास, ती घ्या. प्रवासाची संधी चालून आल्यास ती स्वीकारा.
मीन : मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या निमित्ताने धावपळ होईल. त्यामुळे थकवा जाणवेल आणि डोकेदुखी, अंगदुखी, ताप इत्यादी समस्याही उद्भवू शकतात.