वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर भीषण अपघात झाला. बोरखेडी शिवारात रेल्वेच्या पुलावरुन कार कोसळली जाम नागपूर मार्गावरील बोरखेडी शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवरुन कार खाली कोसळली पुलावरुन कार कोसळत थेट रेल्वे रुळावर पडली कार थेट पुलावरुन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील पाचही प्रवासी गंभीर जखमी झाले एकाच परिवारातील सदस्य असल्याची माहिती आहे. हे सर्व जण हैदराबाद इथून नागपूरला जात होते जखमींना नागपूर जिल्ह्याच्या बुट्टीबोरी येथील माया रुग्णलयात नेल्याची माहिती आहे. जाम महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.