विनोद दुवा यांची पत्रकारिता आजही अनेकांसाठी आदर्शवत अशीच आहे. त्यांनी सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचं विश्लेषणाला सुरुवात केली. त्यांनी जवळपास 42 वर्षाहून पत्रकारिता केली आहे. विनोद दुवा यांनी दूरदर्शनासहित अनेक टीव्ही चॅनेल्सवर बातमीदारी केली होती. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1996 साली विनोद दुवा यांना रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी द वायर वर जन गण मन की बात हा कार्यक्रम सुरु केला. त्यांनी एसडब्लू न्यूजचे सल्लागार संपादक म्हणून काम केलं.