विक्रम वेधा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विक्रम वेधा हा चित्रपट शुक्रवारी (30 सप्टेंबर) रिलीज झाला. विक्रम वेधा हा 2017 मध्ये रिलीज झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. हृतिकनं या चित्रपटात वेधा या खतरनाक गुंडाची भूमिका साकारली आहे. विक्रम वेधा या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 10.58 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 12.51 कोटींची कमाई केली. तीसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 15 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई ही 38 कोटी एवढी झाली आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे.