पहिल्याच चित्रपटानं प्रसिद्धी मिळणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी.



‘KGF’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे श्रीनिधी शेट्टीला ओळख मिळाली.



अभिनेत्री असण्यासोबतच श्रीनिधी शेट्टी मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.



श्रीनिधी शेट्टीने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक किताब आपल्या नावे केले आहेत.



2016 मध्ये श्रीनिधीने ‘मिस डिवा सुपरनॅशनल’ हा किताब जिंकला, त्यानंतर तिने ‘मिस सुपरनॅशनल’ स्पर्धाही जिंकली होती. हे विजेतेपद मिळवणारी श्रीनिधी ही दुसरी भारतीय मॉडेल आहे.



त्याचबरोबर या सौंदर्य स्पर्धांव्यतिरिक्त श्रीनिधीने ‘मिस साऊथ इंडिया’, ‘मिस कर्नाटक’ आणि ‘मिस ब्युटीफुल स्माईल’ हे किताबही पटकावले आहेत.



मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावल्यानंतर श्रीनिधी शेट्टीने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं.



श्रीनिधीचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. अभिनेता यशसोबत 'KGF' चित्रपटामधून तिनं मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.



'KGF' चित्रपटातून तिला चांगलीच पसंती मिळाली.