अभिनेते कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विक्रम या चित्रपटानं 300 कोटींचा टप्पा गाठला आहे. कमल हसन, विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. विक्रम हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम या भाषामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. 'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. विक्रम या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. विक्रम सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांतच 163.07 कोटींची कमाई. चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेता विजय सेतुपतीनं या चित्रपटासाठी दहा कोटींचे मानधन घेतलं आहे.