रुपयाने पहिल्यांदाच एका डॉलरच्या तुलनेत 78 रुपयाचा स्तर गाठला.



सोमवारी, 13 जून रोजी रुपयात 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत.



परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर याचा परिणाम झाला आहे.



परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर विक्री सुरू आहे. त्याच्या परिणामी रुपयातही घसरण सुरू आहे.



रुपयाने आतापर्यंतचा नीचांकी दर 78.26 रुपये गाठला आहे.



रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रुपयात डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे.



जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.



परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे.



युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया 74.62 रुपये इतका होता.



रुपयाच्या घसरणीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.