देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत किंचिंत घट पाहायला मिळाली आहे गेल्या 24 तासांत 8084 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशी 8582 कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला होता देशात एकूण 5 लाख 24 हजार 771 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातील मुंबईत कोरोनाचा संसर्ग अधिक आहे राज्यात 2946 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 1803 कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एकूण 1432 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 46 हजार 337 जण कोरोनामुक्त झाले आहेत दिल्लीत रविवारी दिवसभरात 735 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तामिळनाडूत 249 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत