'वेड' हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला.



वेड या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.



वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.



रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटाने ओपनिंग-डेला 2.25 कोटींची कमाई केली.



वेड हा सिनेमा रिलीज होऊन 18 दिवस झाले आहेत.



वेड या चित्रपटाने आतापर्यंत 48.70 कोटींची कमाई केली आहे.



लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.



जिनिलियाने वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची पोस्ट शेअर केली आहे.



'एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद' असं कॅप्शन जिनिलियाने या पोस्टला दिलं आहे.



वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.