मार्गशीष महिना हा २८ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २३ पर्यंत आहे.

मार्गशीष महिना भगवा श्री कृष्णांचा प्रिय महिना आहे. या महिन्यात कृष्णाची पूजा केली जाते.

तसेच या महिन्यात सूर्य देव, तुळशी आणि लक्ष्मी मातेची ही पूजा केली जाते.

मार्गशीष महिन्यात यमुना नदीत अंघोळ करणे शुभ आणि पवित्र मानले जाते.

कृष्णाचे वडील वासुदेव यांना नवजात कृष्णाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी नदी पार करावी लागली.

ही कालिंदी नदी असल्याचे सांगण्यात येते. हे यमुना नदीचेच दुसरे नाव आहे.

यमुनेने कृष्णाचे चरण स्पर्श केल्याचे सांगितले जाते.

यामुळे कृष्णाला प्रिय असलेल्या या नदीत मार्गशीष महिन्यात अंघोळ करण्याला विशेष महत्व असल्याची मान्यता आहे.

पण यमुना नदीत अंघोळ करण्यास शक्य झाले नाही, तर कोणत्याही पवित्र नदीत तुम्ही अंघोळ करू शकतात.

मार्गशीष महिन्यात नदीत अंघोळ करण्यासोबतच अन्न आणि वस्त्र दान करण्याचे ही महत्व आहे.