दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
वरुणच्या हैदराबाद येथील घरी त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.
या साखरपुड्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेजच्या साखरपुड्याला अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
अल्लू अर्जुन, राम चरण आणि सुपरस्टार चिरंजीवीने साखरपुड्याला हजेरी लावत लावण्या आणि वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत.
आता लवकरच लावण्या आणि वरुण लग्नबंधनात अडकणार आहेत
लावण्या आणि वरुणने सोशल मीडियावर त्यांचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत वरुणने लिहिलं आहे,माझं प्रेम मला मिळालं.
तर लावण्याने लिहिलं आहे,2016 मध्ये मला माझं प्रेम मिळालं आहे.
लावण्याच्या या पोस्टने हे स्पष्ट होतं की 2016 पासून ती वरुणला डेट करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून लावण्या आणि वरुणच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.