बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
सारा अली खान आणि विकी कौशलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
रिलीजच्या चार दिवसांत 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
विकी-कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा हलका-फुलका सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला असल्याचं दिसून येत आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.49 कोटींची कमाई केली होती.
विकेंडला 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे.
एकंदरीत 'जरा हटके जरा बचके' आतापर्यंत या सिनेमाने 26.73 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमाची घौडदौड पाहता लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
'जरा हटके जरा बचके' हा रोमँटिक विनोदी सिनेमा आहे.
'जरा हटके जरा बचके' या सिनेमात विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेत आहे.