शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले इथेच वादाची ठिणगी पडली. या स्टेटसविरोधात काल (7 जून) हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात काल उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी दिली आहे महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे असं शरद पवार म्हणाले. बारामती इथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते