सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. किंग खानचं कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला शाहरुखच्या 'पठाण'ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2033 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात शाहरुखचं आणि त्याच्या सिनेमाचं कौतुक होत आहे. दिवसेंदिवस 'पठाण'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी अर्थात पहिल्या वीकेंडला 58.50 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा 'पठाण' ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या 'पठाण'चा बोलबाला पाहायला मिळत आहे.