वाणी कपूर तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. वाणीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हाईट साडी, स्टोनचे इअर रिंग्स आणि चोकर अशा लूकमधील फोटो वाणीनं शेअर केले आहेत. वाणीच्या या स्टनिंग लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 'तू साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं वाणीच्या या फोटोला केली आहे. वाणीला इन्स्टाग्रामवर सहा मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. वाणी गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शमशेरा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. बेफिकरे, वॉर, बेल बॉटम, शुद्ध देसी रोमान्स या वाणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. वाणीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. तसेच वाणीच्या सोशल मीडियावरील पोस्ट देखील अनेकांचे लक्ष वेधतात.