अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
जॅकलिननं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडे दुबईला जाण्यासाठी परवानगी मागितली होती
आता कोर्टानं तिला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
जॅकलिननं 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी मंजूर झाली आहे.
पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जॅकलिनला दुबईला जायचे आहे.
जॅकलिनने दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, तिला दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
रविवारी (29 जानेवारी) शेड्युल कॉन्सर्टमध्ये जॅकलिनला स्टार परफॉर्ममर म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.
जॅकलीन ही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले.
जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.