अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनुष्कानं नुकतेच तिच्या कूल अँड कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाचा ऑफ शॉल्डर टॉप, ब्यु डेनिम पँट आणि गोल्डन इअर रिंग्स अशा लूकमधील फोटो अनुष्कानं शेअर केले. अनुष्काच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनुष्काला इन्स्टाग्रामवर जळपास 62 मिलियन नेटकरी फॉलो करतात. अनुष्काच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असते. अनुष्काच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.