मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. गुलाबी साडी, गोल्डन इअरिंग्स, गळ्यात गोल्डन कलरचं चोकर, हातात रिंग अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले आहेत. मृणालनं हे फोटो शेअर करुन त्याला 'साडी लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. मृणालनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. मृणाल तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मृणालला इन्स्टाग्रामवर 7 मिलियन पेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात.