गेल्या काही दिवसांपासून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.



नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे.



नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला.



मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.



गाण्यातून वैभव आणि पूजा यांच्या प्रेमाचा सदाबहार रंग दिसणार आहे.



‘चल अब वहाँ’ अल्बम मधील गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलं आहे.



गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे तर काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे.



विदुर आनंद यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अब्दुल शेख यांचा स्वरसाज लाभला आहे.



पूजाचा 'दगडी चाळ 2' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तर वैभवच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



चिटर आणि भेटली तू पुन्हा या चित्रपटांमध्ये पूजा आणि वैभव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना दिसली.