अभिनेता रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फझल यांनी हे बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. अलीकडेच लखनौमध्ये रिचा आणि अली यांच्या लग्नाचा एक भव्य सोहळा पार पडला. भव्य सोहळ्यात रिचा आणि अली यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांव्यतिरिक्त जवळचे मित्र उपस्थित होते. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा दिल्लीत मेहंदी, हळदी आणि संगीत सेरेमनी झाली. त्यानंतर हे जोडपे लखनौला पोहोचले. ऋचा चढ्ढा यांच्या सासरच्या मंडळींनी लखनौमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. रिचा आणि अली यांचे लग्न 2020 मध्येच झाले आहे. पण कोरोनामुळे भव्य समारंभ झाला नव्हता तो नुकताच पार पडला. भव्य समासंभानंतर रिचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिचा आणि अली दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.