दक्षिण चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर होती.

गेल्या दोन महिन्यांपासून समंथाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी कोणताही संपर्क ठेवला नाही.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या समंथाच्या चाहत्यांना न सांगता ब्रेकवर जाण्याचा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही.

सोशल मीडियावरून अचानक गायब झाल्याने समंथाच्या चाहत्यांमध्ये तिच्याबद्द घबराट निर्माण झाली होती.

सोशल मीडियावरून सक्रियता कमी केल्यानंतर समंथा रुथ प्रभू हिच्या प्रकृतीबाबतही अनेक प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की समंथा डिप्रेशनमध्ये आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समंथा त्वचेशी संबंधित गंभीर समस्यांशी झुंज देत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

समंथा आता सोशल मीडियावर परत आली आहे.

समंथाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

समंथा सोशल मीडियावर परत आल्यानंतर चाहते खुश झाले आहेत.

अनेक चाहत्यांनी वेलकम बॅक अशा कटमेंट्स समंताच्या फोटोला दिल्या आहेत.