अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये वाणी फिकट गुलाबी रंगाच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसत आहे या लूकसाठी तिने लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत या लेहेंग आणि चोलीसह तिने मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत या लूकमध्ये वाणी कमालीची ग्लॅमरस दिसत आहे वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटासाठी वाणीला पदार्पण करणाऱ्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला वाणी 2021 साली चंदीगढ करे आशिकी या चित्रपटात ट्रांन्सवूमनच्या भूमिकेत झळकली होती