दम्याच्या आजारापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही घरगुती फळभाज्यांचा आहारात समावेश करा.



टोमॅटो ज्यूसमध्ये लाइकोपीन सारख्या अँटिऑक्सिडंटचा समृद्ध स्रोत असल्याने, ते कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.



शिमला मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.



पालक या सुपर फूडमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम व्हिटॅमिन-ई सारखे पोषक घटक असतात.



फरस्बीमध्ये असलेले व्हिटॅमिन-बी तुम्हाला नैराश्य कमी करण्यास मदत करू शकते.



रक्तदाब, हृदयविकार आणि फुफ्फुसाचे आजार अशा अनेक आजारांशी लढण्यासाठीही आलं फायदेशीर आहे.



डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे सेलचे नुकसान टाळण्यास मदत करते.



एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि फायबर, मॅग्नेशियम, बी-6, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फोलेट भरपूर असतात. त्यामुळे श्वसनाचे आजार टाळण्यास मदत होते.



सफरचंद हे वजन कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.