भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज सर्वत्र ईद साजरी होत आहे. या खास प्रसंगी स्टार्सही त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री राणी चॅटर्जीनेही काही वेळापूर्वी चाहत्यांना देसी शैलीत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राणी चटर्जीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. राणी चटर्जीने फोटो शेअर करताना त्याखाली कॅप्शन देऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईदच्या निमित्ताने राणी चॅटर्जी पुन्हा एकदा देसी अवतारात दिसली आहे. राणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. राणी चटर्जीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या चिकनकारी कुर्तीमध्ये दिसत आहे. तिने हातावर मेहंदी काढली असून कानात मोठे झुमके घातले आहेत. चाहत्यांना राणीचा हा लूक खूपच आवडला आहे.