पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा नुकतीच हमजा अमीनसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

नवविवाहित जोडप्याचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

लाल रंगाचा लेहेंगा, बांगड्या, झुमके, दागिने असा काहीसा उस्नाचा नववधू लूक होता.

अभिनेत्रीच्या फोटोवर भारतीय संस्कृतीला पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न करु नको, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

ट्रोल केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहाने ट्रोलर्सची शाळी घेतली आहे.

अभिनेत्री नववधूच्या लुकमधील फोटो शेअर करत लिहिलं आहे की, माझ्या लूकची अडचण असणाऱ्यांना माझं सांगणं आहे की, मी परिधान केलेले कपडे तुम्ही विकत घेतलेले नाहीत.

पाकिस्तानी अभिनेत्रीला एकीकडे ट्रोल केलं जात असताना काही मंडळींनी मात्र तिचं समर्थन केलं आहे.

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने लिहिलं आहे,प्रत्येक गोष्टीचा आपण सकारात्मक विचार का करु शकत नाही.

उस्ना शहाचा लग्नसोहळा आणि नववधू लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.