पलक तिवारी तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. पण अलीकडेच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ट्रोल होताना दिसली. नुकतेच पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पलक खूपच बोल्ड लूकमध्ये दिसली होती. तिने प्रिंटेड ट्राउझर्ससोबत जांभळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. तिला काही तासांतच दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.