बीटीएस या जगप्रसिद्ध कोरियन ब्रॅंडचा सदस्य जे - होप सैन्यात भरती होणार आहे. जे-होपने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सैन्यात भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. जे-होप म्हणाला,आता मी 30 वर्षांचा झाला असून अनिवार्य लष्करी सेवेत काम करण्यात सज्ज आहे. सैन्यात भरती होण्यापूर्वी जे-होप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहे. जे-होपचा पुढचा अल्बम 'जिमीन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जे-होपच्या 'जिमीन' या अल्बमची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जे-होपचा जन्म 18 फेब्रुवारी 1994 रोजी दक्षिण कोरियात झाला. संगीतक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जे-होपला संघर्षाचा सामना करावा लागला आहे.