सुकवलेले रिठे, आवळा आणि शिकेकाई हे तीन मुख्य घटक हर्बल शॅम्पू तयार करण्यासाठी आवश्यक आहेत.

हर्बल शॅम्पू तयार करण्यासाठी सुकवलेले आवळा, रिठा, शिकेकाई, ब्राम्ही, भृगराज, मेथीचे दाणे, कलौंजी प्रत्येकी एक वाटी एकत्र करावेत.

हे सगळे पदार्थ एकत्र करुन त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावं. मऊ झालेले हे पदार्थ कुचकरुन घ्यावे.

त्यानंतर त्यात कडुनिंबाची, जास्वंदीची आणि कडीपत्त्याची पानं घालून मिश्रण उकळून घ्यावं.

हे मिश्रण उकळून झाल्यानंतर थंड करुन गाळून घ्यावं.

हा शॅम्पू महिनाभर वापरण्यासाठी योग्य ठरेल.

आंघोळीच्या आधी अर्धा ते एक तास या शॅम्पूने केसांना हलक्या हाताने मालिश करावी.

आंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करणं टाळावं.

हर्बल शॅम्पूचा वापर 3 ते 4 वेळा केल्याने केसांचं गळणं कमी होईल.

केसांमधील कोंडा निघून जाऊन केस दाट काळेभोर आणि चमकदार होतील.