बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत की उर्फीने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. उर्फीचा लेटेस्ट लूक समजून घेण्यासाठी चाहते चांगलेच गोंधळून गेले आहेत. उर्फी जावेद पुन्हा एकदा फॅशन क्वीनच्या रुपात सार्वजनिक ठिकाणी पोहोचली आहे. उर्फीने शेअर केलेल्या फोटोत तिने गळ्यात साखळदंड गुंडाळे आहेत. ती एवढ्यावरच थांबली नाही तर या साखळ्यांवर वेगवेगळ्या रंगांची छोटी कुलूपंही लटकलेली आहेत. उर्फीने या साखळ्या तिचा पोशाख म्हणून बनवल्या आहेत. यावर तिने जाळीदार स्कर्ट कॅरी केला आहे. उर्फी जावेदचा नवीन अवतार पाहिल्यानंतर तुम्ही तिचा पोशाख समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर थांबा. कारण तुमचाही गोंधळ होऊ शकतो.