बाजारात अशी काही फळे उपलब्ध आहेत, जी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा फळांपासून लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष सतर्क राहावे.
तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीरावरील चरबी अर्थात फॅट कमी करायचे असेल, तर आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे.
कमी फॅटयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. वाढत्या वजनाने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
बदलती जीवनशैली आणि तेलकट अन्न यामुळे वजन वाढणे सामान्य आहे, त्यामुळे पोटाची चरबी देखील खूप वाढते.
आंबा विशेषतः उन्हाळ्यात खाल्ला जातो, ज्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते. भारतातील लोक आंबा खूप आवडीने खातात, तसेच मँगो शेक देखील इथे खूप आवडीने प्यायला जातो. पण, आंब्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. वजन वाढवण्यासाठी हे फळ कारणीभूत ठरते.
अननस हे फळ देखील खायलाही खूप गोड असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. विशेषत: मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना आंबा आणि अननस न खाण्याचा सल्ला दिला जातो.