बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद यांचा मोगा मतदारसंघातून पराभव झाला आहे. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका हिने 10 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपच्या डॉक्टर अमनदीप कौर आरोरा यांनी मालविका सूद यांचा पराभव केला आहे. आपच्या त्सुनामीचा मालविका सूद यांना चांगलाच धक्का बसला आहे. मालविका सूद या अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. मालविकाने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्या मोगा येथे इंग्रजी कोचिंक सेंटर चालवतात. मालविका यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. मालविकाला पंजाबमधील मोगा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले होते.