‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. हटके ड्रेसिंग सेन्समुळे उर्फीचा सर्वत्र बोलबाला आहे. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. उर्फी तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबद्दल देखील अपडेट करत असते. नुकतेच उर्फीने गुलाबी स्कर्टमध्ये हटके फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. यात उर्फीने पांढरा टॉप आणि गुलाबी स्कर्ट परिधान केला आहे. हे फोटो रोहित कांबळे या फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. (All PC : urf7i/IG)