दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली.
साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.