‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. हटके ड्रेसिंग सेन्समुळे उर्फीचा सर्वत्र बोलबाला आहे. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतो. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. उर्फी तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबद्दल देखील अपडेट करत असते. नुकतेच उर्फीने ‘गंगूबाई काठियावाडी’तील हटके फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. यावेळी उर्फीने ‘गंगूबाई काठियावाडी’तील आलिया भट्टचा लूक कॉपी केला आहे.