सुझान खानची बहिण आणि सेलिब्रिटी ज्वेलरी डिझायनर फराह खान अलीनं उर्फी जावेदच्या ड्रेसिंग स्टाईलवर कमेंट केली.



फराह म्हणाली, , 'माफ करा पण या मुलीच्या कपड्यांबद्दल हिला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. लोक तिची चेष्टा करतात. पण तिला वाटतं की लोक तिचं कौतुक करत आहेत.'



'कोणी तरी तिला सत्य सांगा. ' फराहची ही कमेंट पाहिल्यानंतर उर्फी भडकली



उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले, 'फराह मॅम टेस्टफुल ड्रेसिंग काय असतं? प्लिज याचा अर्थ मला सांग.'



उर्फी म्हणाली, ' मला माहित आहे की लोकांना माझी ड्रेसिंग स्टाइल आवडत नाही.'



पुढे ती म्हणाली, 'लोक तुमच्या कुटुंबाबद्दल बोलतात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता का?'



'स्टार किड्स देखील त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होतात. त्यांना तुम्ही ड्रेसिंग सेन्स बदलायला सांगता का?' असा प्रश्न देखील उर्फीनं फराहला विचारला.



उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले.