लिंबू पाण्याने झटपट ऊर्जा तर मिळतेच. पण त्याचबरोबर शरीरालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही एक ग्लास लिंबूपाणी जरी प्यायलात तरी दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटते. लिंबूमध्ये हायड्रेशन तसेच तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे ते केसांना आतून पोषण देते आणि त्यांची मुळे मजबूत करण्याचे काम करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ते तुमच्या त्वचेच्या दुरुस्तीचा वेग वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहरा उजळतो. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही मुरूमांनी त्रस्त असाल तर तुम्ही दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यावे. व्हिटॅमिन-सी आणि सायट्रिक ऍसिडमुळे, लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि ते तोंडाच्या समस्याही दूर होतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.