बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

'तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.


माधुरीच्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले.

आपल्या नृत्याने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या माधुरीला लोक ‘धकधक गर्ल’ या नावाने हाक मारू लागले.

माधुरीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे.

माधुरीची अनामिका ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.


सोशल मीडियावर माधुरीचा मोठा चाहतावर्ग आहे.