अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अभिनयापेक्षा अतरंगी फॅशनमुळे जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता उर्फी जावेदला अटक झाल्याचं म्हटलं जात आहे. उर्फीला तोकडे कपडे घालणं महागात पडलं आहे. तोकडे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फीला ताब्यात घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी सकाळी-सकाळी एका कॉफी शॉपमध्ये बसलेली दिसत आहे. दरम्यान पोलीस अधिकारी तिला ताब्यात घेतात. उर्फीला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात घेऊन जातात. उर्फी त्यांना त्यामागचं कारण विचारत, त्यावर त्या पोलीस अधिकारी म्हणतात,एवढे छोटे-छोटे कपडे परिधान करून कोण फिरतं?. उर्फीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा बॅकलेस टॉप आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे. करण जोहरच्या 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.