बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा नुकताच 58 वा वाढदिवस साजरा झाला आहे. वाढदिवशी शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर तुफान गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, शाहरुखच्या चाहत्यांचे गर्दीत 34 मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. 'मन्नत' बाहेर मोबाईल चोरी झाल्यानंतर चाहत्यांनी मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शाहरुखच्या वाढदिवशी हजारो चाहत्यांनी 'मन्नत'बाहेर मोठी गर्दी केली होती. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या ठिकाणांहून लोक एसआरकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. शाहरुख खान दरवर्षी वाढदिवसाला 'मन्नत'च्या गॅलरीत येऊन चाहत्यांची भेट घेत असतो. मन्नतबाहेर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला. आलोक कुमार, अरबाज वाहिद खान, विनय वानखेडे, गुलाम कामरा आदि लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.