अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi javed) तब्येत अचानक बिघडली असून तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उर्फीला खूप ताप आहे, त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.

उर्फी जावेदच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उर्फीची तब्येत खराब होती.

गेल्या काही दिवसांपासून उर्फीचे उलट्यांचा त्रास होत आहे.

आज तिला 103 ते 104 डीग्री ताप आला, त्यानंतर तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे लागले.

तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यांमुळे तिच्या तापाचे कारण काय आहे हे कळू शकेल. सध्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्यामुळे ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली नाही.