संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला काहीच तास उरलेत.

तरी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे.

इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे.

इंद्रायणी नदीत आज पुन्हा फेसाळ पाणी वाहताना दिसत आहे.

जे पाणी वारकऱ्यांच्या आरोग्याला धोका ठरत आहे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा याला कारणीभूत ठरत आहे

पिंपरी चिंचवड हद्दीतील अनेक कंपन्या इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडतात, परिणामी नदीची दयनीय अवस्था होते.

एबीपी माझाने जानेवारी महिन्यात हा प्रकार समोर आणला होता त्यावेळी

सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कारवाईचा

हा फार्स होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे