मुंबई कोस्टल रोड बांधकामात पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान 2.070 किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे.

यातील पहिल्या बोगद्याचा दोन किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे

तर उर्वरित 70 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होणार आहे.

संपूर्ण मुंबई किनारी रस्ता प्रकल्‍पापैकी सुमारे 50 टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

डिसेंबर 2023 मध्‍ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्‍येकी 2.070 किलोमीटर एवढी आहे

दोन्ही बोगद्यांचा व्यास हा 12.19 मीटर आहे

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतुकीची समस्या सुटणार आहे

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.


बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम - टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जाते