अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण!



'भ्रष्टाचार', 'हम', 'खुदा गवाह', 'आंखें', 'किशन कन्हैया', 'सनम बेवफा', 'गज गामिनी' यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर.



अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.



शिल्पा शिरोडकरला आज क्वारंटाईन होऊन चार दिवस झाले आहेत.



तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'सर्वजण सुरक्षित राहा. लस घ्या आणि सर्व नियमांचे पालन करा.'



शिल्पा ही दुबईमध्ये राहते. 2000 मध्ये तिनं अप्रेश रंजीतसोबत लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये शिल्पाने लसीचे दोन डोस देखील घेतले होते.



8 जानेवारीला शिल्पाने एबीपी न्यूजला माहिती दिली होती. तिनं सांगितलं होते की,



'मी दुबईमध्ये सिनोफार्म (Sinopharm)नावाची लस घेतली आहे.



माझी प्रकृती व्यवस्थित आहे. 27 जानेवारीला मी दुसरा डोस घेणार आहे. '



(Photo:@Actress Shilpa Shirodkar/IG)