ट्विटरला नवे सीईओ मिळाल्यानंतर लगेच काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.




ट्विटर वापरकर्त्यांना अन्य वापरकर्त्याच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी फोटो, व्हिडीओ शेअर करण्याला बंधनं घालण्यात आली आहेत.  

नवीन नियमांनुसार, यूजरच्या परवानगीशिवाय अन्य लोकं त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करु शकणार नाहीत.

शोषण विरोधी धोरणाला अधिक मजबूत करण्यासाठी ट्विटरनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. 

Twitter नं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

हे धोरण त्या लोकांसाठी नाही जे प्रसिद्ध व्यक्ती (Public Figure) आहेत. त्यांच्या ट्विट्सला सार्वजनिक हितासाठी शेअर केले जाऊ शकते. 

ट्विटरच्या मते खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानं एखाद्या व्यक्तिच्या गोपनियतेचा भंग होऊ शकतो.



त्यामुळं त्या व्यक्तिचं भावनिक किंवा शारिरीक नुकसान होऊ शकतं